JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आता बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार; लवकरच SOP होणार लागू

आता बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार; लवकरच SOP होणार लागू

चित्रपट सृष्टीसह मनोरंजन क्षेत्रामधील निर्माते व कलाकारांसाठी शिंदे फडणवीस सरकार नियमावली आणणार आहे.

जाहिरात

बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : चित्रपट सृष्टीसह मनोरंजन क्षेत्रामधील निर्माते व कलाकारांच्या मनमानीला आता शिंदे फडणवीस सरकार लगाम लावणार आहे. कारण चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांसहित निर्माते व दिग्दर्शक यांसाठी एक नवीन नियमावली सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार द्यावे लागणार असून ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे बॉलीवडूवर नियंत्रण बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार आहे. बॉलीवूड मधील कामगार, कलाकार व निर्मात्यांसाठी नवीन नियमावली (एसओपी) तयार करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांवर कामगार व कलाकारांची जबाबदारी असेल. चित्रपट, सिरीयल, जाहिराती आणि वेब सिरीज यांना एसओपी लागू करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कामगार व कलाकारांचे शोषण थांबवण्यासाठी एसओपी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचे बंधनकारक असेल. आपले सरकार पोर्टलसह तक्रार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. महिला कामगारांना घरपोच वाहतूक व्यवस्था पुरवण्याचे आदेशही यात आहेत. वाचा - आजारपण असून समांथा अनवाणी चढली मंदिराच्या 600 पायऱ्या; प्रत्येक पायरीवर पेटवला कापूर, Photo व्हायरल तक्रार निवारण्यासाठी नवे पोर्टल तयार करण्यात येणार याउलट नव्या नियमावलीत कलाकार व कामगारांनाही अचानक काम बंद करून निर्माते व दिग्दर्शकांना वेठीस धरता येणार नाही. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे कलाकार व कामगारांना कोणतीही समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी एक नवे पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

या पोर्टलवर चित्रपट सृष्टीत उपलब्ध असलेल्या कामाची माहिती ही कलाकार व कामगारांना मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या