'चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. ते योग्य नाही, याचं समर्थन मी करणार नाही. पण त्यांनी जर हे बोलले नसतं तर हे झालं नसतं.
मुंबई, 12 डिसेंबर : ’ शब्द काय वापरला भीक. हा वापरला नसता तर चांगलं झालं आहे. यानंतर लगेच सांगून टाकलं, मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे केलं. याच्याआधी तुम्ही पाच वर्षी मंत्री होता, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होता. आताही तुम्ही मंत्रिमंडळात नेते आहात. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री झाले हे काय फक्त तुम्हीच आहात का? महाराष्ट्रात असे अनेक मंत्री झाले आहे, पण त्यांनी कधी असा कांगावा केला नाही’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना फटकारलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई यशवंत चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक प्रकरणावर भाष्य केलं.
‘चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. ते योग्य नाही, याचं समर्थन मी करणार नाही. पण त्यांनी जर हे बोलले नसतं तर हे झालं नसतं. त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव यांच्याबद्दल भाष्य केलं. भाऊरावांनी आपलं आयुष्य हे ज्ञान देण्यासाठी खर्ची घातलं. त्यांच्या पत्नीने गळ्यातलं सोनं सुद्धा दिलं. आणि पाटील यांनी शब्द काय वापरला भीक. हा वापरला नसता तर चांगलं झालं आहे, हा शब्द कुणालाही पसंद पडणारा नाही. लगेच सांगून टाकलं, मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे केलं. याच्याआधी तुम्ही पाच वर्षी मंत्री होता, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होता. आताही तुम्ही मंत्रिमंडळात नेते आहात. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री झाले हे काय फक्त तुम्हीच आहात का? महाराष्ट्रात असे अनेक मंत्री झाले आहे, पण त्यांनी कधी असा कांगावा केला नाही. असं बोलला नसता तर चांगलं झालं असतं. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपू याची काळजी घेऊ, असा सल्ला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना दिला. (महापुरुषांची प्रेरणा घेऊन बोलायचं असतं, पण…, पंकजा मुंडेंचं राज्यपालांच्या विधानावर मोठं भाष्य) ‘आज आपण अडचणीच्या काळातून जात आहोत. समृद्धी महामार्गाला विरोध केला असं बोलले कोणी विरोध केला. राज्यकर्त्यांनी सुद्धा संपुर्ण देशाच्या प्रांताकडे बघताना देशाचे नेतृत्व करतो असा दृष्टीकोन पाहिजेत. तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथे विरोधकांवर टीका केली, ती समजू शकतो. पण शासकीय कार्यक्रमाला गेला, रेल्वेचं उद्घाटन केलं, मेट्रोचं केलं, अशा ठिकाणी देशाचा पंतप्रधान सरकारी कार्यक्रमात विरोधकांवर टीका करतो हे कितपत शहाणपणाचं आहे याचा विचार केला पाहिजे’ असा सल्लावजा टोला पवारांनी पंतप्रधान मोदींना लगावला. विरोधी पक्ष या देशाच्या संस्था आहे. त्यांचा विचार केला पाहिजे. समृद्धी महामार्गाचा विरोध केला. कुणी केला आणि कधी केला हे मला कळले नाही. औरंगाबादमध्ये काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली होती. त्यांना जमिनीचा मोबद्दला कमी दिला जात होता. त्यावेळी फडणवीस यांना फोन केला आणि जास्त रक्कम देण्याची मागणी केली होती. आता त्यावर लगेच विरोधाला विरोध केला असं सांगणे योग्य नाही, असंही पवार म्हणाले. (Anil Deshmukh : परमबीर सिंगांचा फुसका ‘बार’, कोर्टात झाली पोलखोल, देशमुखांचे वकील म्हणाले…) दरम्यान,महाराष्ट्रातील एक मोठं सरकार खोट्या बंडानंतर उलथवून ठाकले. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे सरकार होते. सध्याच्या सरकार मध्ये महाराष्ट्र प्रेमी पेक्षा महाराष्ट्र द्रोह्यांची संख्या वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली जातेय. जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का विचारता. महिला खासदारांना शिवराळ भाषा वापरात हे महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर केली.