JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर मोठी अपडेट; 'या' तारखेला होणार फैसला

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर मोठी अपडेट; 'या' तारखेला होणार फैसला

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

जाहिरात

हसन मुश्रीफ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांचं कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहेत

काय आहे प्रकरण? ज्येष्ठ वकील अमित देसाई, आबाद पोंडा, प्रशांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची बाजू मांडली होती. तर ईडीच्या वतीनं सुनील गोंसालवीस यांनी जोरदार विरोध केला होता. विशेष पीएमएलए कोर्ट न्यायाधीश एमजी देशपांडे यांच्या कोर्टात सुनावणी झाली होती. मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. कथित भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही ठपका यात ठेवण्यात आला आहे. अनैतिक मार्गानं पैसे वळवून, मनी लाँड्रीन्ग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. निकालाचं वाचन अद्याप अपूर्ण आहे. वाचा - अवकाळी पाऊस आता नैसर्गिक आपत्ती, शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय हसन मुश्रीफ यांची गेल्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल तीन ते चार वेळा चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफांनी स्वत: गेल्या आठवड्यात सात तासांच्या चौकशीनंतर आपण ईडी कार्यालयात चौथ्यांदा आल्याची माहिती दिली होती. याशिवाय आपण ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केले. ईडी अधिकाऱ्यांचा एकही प्रश्न आपण टाळला नसल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर कोर्टात दोन दिवसांपूर्वी युक्तिवाद पार पडलेला. या प्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी विशेष पीएएमएलए कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण कोर्टाने या प्रकरणाचा तातडीने निकाल जाहीर केला नाही. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. तसेच येत्या 5 एप्रिलला याबाबतचा निकाल देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. यावर आता 11 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या