JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने; दोघांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने; दोघांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद

आदित्य ठाकरे बोलत असातान प्रकाश सुर्वे हे एक शब्दही बोलू शकले नाही. केवळ चेहऱ्यावरील तणात हसून दूर करण्याचा प्रयत्न प्रकाश सुर्वे करत होते हे दिसून येत होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जुलै: समोर आल्यावर बंडखोर आमदार डोळ्यात डोळे घालू बोलू शकणार नाहीत, असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होत. या दरम्यान आज बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले. दोघांनीही हस्तांदोलन केलं. दोघांची भेट आणि संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नाहीत. काय होतं संभाषण? बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे समोर आल्यानंतर काहीशी चिंता प्रकाश सुर्वे यांच्या चेहऱ्यावर दिसली. प्रकाश सुर्वे समोर येताच आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, एवढे जवळचे असून असं कराल असं वाटलं नव्हत. काय सांगाल मतदार संघात? त्यादिवशी जेवण तयार ठेवलं होतं, आम्ही तुमच्याकडे येत होतो. असं कराल खरंच अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होत. हे तुम्हाला पण माहित आहे. पण बघा आता विचार करा, पण मला स्वत:ला दु:ख झालं. देवेंद्र फडणवीसांनी बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृष्य हातांचे मानले आभार, कोण आहेत ते अदृष्य हात आदित्य ठाकरे बोलत असातान प्रकाश सुर्वे हे एक शब्दही बोलू शकले नाही. केवळ चेहऱ्यावरील तणात हसून दूर करण्याचा प्रयत्न प्रकाश सुर्वे करत होते हे दिसून येत होतं. ‘सुरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो’, गुलाबराव पाटलांनी खासगी गोष्ट केली उघड व्हीपचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार : आदित्य ठाकरे शिवसेनेची कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती. मात्र शिवसेना कधीही संपणार नाही. सध्या सर्व आमदार एका बबलमध्ये राहतायेत. कधी गोवा, कधी सूरत तर कधी गुवाहाटी येथे ते राहतायेत. मात्र त्यांना कधीतरी त्यांच्या मतदारसंघात जावं लागेल. तेव्हा मतदारांचं म्हणणं काय आहे त्यावेळी काही स्पष्टता येईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या