मुंबई, 27 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती मुंबईतील रहेजा कॉलेजमधील शिक्षक असून भारत गीते असं त्याचं नाव आहे. अन्य शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. नाशिकमध्ये वायुदलाचे सुखोई विमान कोसळल्यानंतरचे भीषण फोटो
विष प्राशन करून या शिक्षकानं आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शिक्षकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.