JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / नाराज 'शिलेदारांना' जोडण्याचा प्रयत्न, 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट

नाराज 'शिलेदारांना' जोडण्याचा प्रयत्न, 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट

‘23 तारखेच्या महाअधिवेशनामध्ये येण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. या अधिवेशनात मनसेत मोठ्या इनकमिंगची शक्यता आहे.’

जाहिरात

Mumbai: MNS Chief Raj Thackeray addresses a press conference regarding Plastic Bag Ban issue, at his residence in Mumbai on Tuesday, June 26, 2018. (PTI Photo) (PTI6_26_2018_000308B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जानेवारी : मनसेच्या महाअधिवेशनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबई 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसेचा हा महामेळावा होतोय. या महावेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची नवी दिशा ठरवणार आणि सांगणार आहेत. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सोडून गेलेल्या शिलेदारांना पुन्हा मनसेत आणण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्याचबरोबर प्रकाश महाजन यांनाही राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं होतं. या भेटीनंतर प्रकाश महाजन म्हणाले, 23 तारखेच्या महाअधिवेशनामध्ये येण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. 23 तारखेच्या अधिवेशनात मनसेत मोठ्या इनकमिंगची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा हिंदुत्व मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे. हर्षवर्धन जाधव म्हणाले,राज ठाकरेंनी भेटीचे आमंत्रण दिले होते, त्यानुसार आमची भेट झाली. गेल्या अनेक काळापासून आम्ही संपर्कात नव्हतो. या काळातील बऱ्यात विषयांवर चर्चा झाली. मी परत यायचं की नाही यासाठी विचार करायला मला वेळ हवाय. मी लवकरच निर्णय जाहीर करतो. काल ‘चूक’ आज ‘अभिमान’, मेगाभरतीच्या वादावर चंद्रकांत पाटलांचा यू टर्न या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले… 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी ‘शिवराजमुद्रा’ असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या