या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई, 06 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये (Lakhimpur Violence case) शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही (mva govenment) या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. ‘लखीमपूरची घटना अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्यांचा मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारले आहे. यात त्याचा सहभाग दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारणं असं कुठेही सरकारनं केलं नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं केलं आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. VIDEO - पाऊटसाठी तरुणीने ओठांची वाट लावली; आता दाखवण्यालायकही राहिले नाही लिप्स ‘या घटनेचा निषेध म्हणून आम्ही 11 ऑक्टोबरला राज्यात बंद पुकारत आहोत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे’, असंही पाटील यांनी सांगितलं. ’ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना हे कृत्य करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भाजपची समाजकंटकाबाबतची ही भूमिका स्पष्ट करणारी आहे. जनरल डायर च आठवण करणार हे कृत्य आहे’ अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. न्याय! तिघांची हत्या करणाऱ्याला ‘मृत्युचे इंजेक्शन’, मरताना आठवला स्वर्ग क्रुझवर जी काही कारवाई झाली त्यानंतर आरोपींना घेऊन ते जातात, ncb पेक्षा त्यांचा रोल जास्त आहे असं दिसतं आहे. मुंबईतून हे bollywood दुसरीकडे जावं यासाठी हा प्रयत्न आहे. Ncb ला माहिती दिली तर ते पकडणार ना. तू कोण पकडणार? केंद्रीय तपास यंत्रणेचा हा दुरुपयोग होत आहे, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली.