JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / नालासोपाऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; अडीच लाखांचे कंडोम जप्त, 4 तरुणींची सुटका

नालासोपाऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; अडीच लाखांचे कंडोम जप्त, 4 तरुणींची सुटका

Crime in Mumbai: मुंबईनजीक असणाऱ्या नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका चाळीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नालासोपारा, 25 जुलै: मुंबईनजीक असणाऱ्या नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका चाळीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात (2 arrest) घेतलं आहे. यामध्ये एका महिलेसह तृतीयपंथीयाचा समावेश आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे. पोलिसांनी छापा (raid) टाकून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वालीव पोलीस करत आहेत. नालासोपारा पूर्व परिसरातील पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची  माहिती नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी मिळाली होती. यानंतर पोलिसांनी माहिती शहानिशा केल्यानंतर याठिकाणी छापा टाकला आहे. वालीव पोलिसांनी छापा टाकून चाळीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला आहे. दरम्यान पोलिसांनी चाळीतील एका खोलीत डांबून ठेवलेल्या चार तरुणींची सुटका देखील केली आहे. संबंधित दोन आरोपी पीडित मुलींकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा- महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो केले व्हायरल, बुलडाण्यातील संतापजनक घटना टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, वसुंधरा संजय तिवारी (वय 48) आणि अंजली राजकुमार यादव (वय 45) असं अटक आरोपींची नाव आहे. वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. दोन्ही आरोपी पीडित तरुणींकडून जबरदस्तीनं  वेश्या व्यवसाय करून घेत होते. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. हेही वाचा- पतीच्या ‘पॉर्न अ‍ॅडिक्शन’मुळे वैतागली पत्नी, व्यथा सांगत मागितली ही मदत पोलिसांनी या कारवाई दरम्यान, आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे निरोध (कंडोम्स) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत. वालीव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या