राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे.
मुंबई, 16 जून : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरमोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे आतापासूनच भाजपने मिशन लोकसभा (loksabha election 2024) हातात घेतली आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे. भाजपा जिल्हाध्यक्षांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. भाजपचे विरोक्षीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणूक संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे. भाजपा जिल्हाध्यक्षांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्रातील सर्व योजना आपल्या जिल्ह्यात घरोघरी राबवणे. लोकसभा निवडणूक संदर्भात जे काही कार्यक्रम असतील ते तंतोतंत राबवणे, असे आदेश नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. केद्रांची सर्व मतदारसंघावर बारीक नजर असून याचा आढावा जिल्हाध्यक्ष यांनी घ्यायचा आहे. राज्यातील एकूण 18 लोकसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. १६ लोकसभा मतदार संघामध्ये जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्याचा दौरा होणार आहे. ( IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी ) भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. आम्ही राज्यात एक समिती नेमली आहे त्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली. पुढच्या 18 महिन्यात काय करायचे हे नियोजन आखलं आहे. फक्त निवडणुकीपुरते नाही तर सातत्याने आमचे लोक, जी आम्ही जिकलो त्यावर तर आमचे लक्ष आहे पण जे नव्याने जिंकायचे त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहेत. 48 मतदारसंघात आम्ही ताकदीने जिकू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली म्हणून काँग्रेसचे आंदोलन चुकीचे आहे. ज्या प्रकारे 2 हजार कोटींचे व्यवहार झाले. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची कंपनी आपल्या ताब्यात घेतली. याची ही चौकशी सुरू आहे. सर्व संपत्ती गांधी परिवाराला मिळाली आहे, त्यामुळे काँग्रेसने आंदोलन करण्याची काहीच गरज नाही, असा टोला फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला. ( ‘विधान परिषदेत खडसेंना पाडण्याचा प्लॅन’, खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप ) राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडे पूर्ण संख्याबळ आहे. एनडीएने जर उमेदवार उभा केला तर तो निवडून येऊ शकतो हे सर्वच राजकीय पक्षांना माहिती आहे. शरद पवार यांनी तब्येतीचे कारण देऊन नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. अजित पवार यांना भाषण करू दिले नाही म्हणून ते नाराज असतील असं सांगितलं जात आहे. पण अजितदादा यांची कोणतीही नाराजी नाही. अजितदादा आणि मोदींचं नात कोणाला तरी पाहवत नाही. उलट अजितदादांची मोदी हे अस्थेने विचारपूस करत होते, असंही फडणवीस म्हणाले.