JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Assembly Session: विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता

Maharashtra Assembly Session: विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता

ल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनात झालीच नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जुलै: वादळी ठरलेलं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) रखडली गेली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या (assembly speaker election) निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. मागील अधिवेशन अध्यक्षविनाच पार पडले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी पुढे आली. परंतु, पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. हिवाळी अधिवेशन पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; ‘सुपरमॅन’ सारख्या चित्रपटांसाठी आहे ओळख अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री ठाकरे अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाही, अशी माहिती समोर आली होती आणि झालंही तसंच आहे. तसंच,  महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळेही हा निर्णय टाळण्यात आला.

श्रीलंकेचा सनथ भ्रष्टाचारात अडकला, क्रीडा मंत्र्यांनाच ऑफर केली लाच

विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या पूर्वीच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असं पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते.  पण, राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या