JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : राज्यात Omicron चा उद्रेक, रुग्णांची संख्या पोहोचली 167 वर

BREAKING : राज्यात Omicron चा उद्रेक, रुग्णांची संख्या पोहोचली 167 वर

राज्यात 26 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये 11, रायगड 5 ठाणे 4 आणि नांदेडमध्ये 2 रुग्ण आढळले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) राज्यात आपले हातपाय पसरत चालला आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज सुद्धा राज्यात 26 ओमायक्रॉनचे (maharashtra Omicron) रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 11 रुग्ण आढळले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा 2 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. राज्यात 26 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये 11, रायगड ५  ठाणे ४ आणि नांदेडमध्ये २ रुग्ण आढळले आहे. तर नागपूर, पालघर, भिवंडी आणि पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. ( पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह कसे तयार झाले? संशोधनात आधीच्या संकल्पनेला छेद ) राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद ही मुंबईमध्ये झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ८४ रुग्ण आढळले आहे. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १९ आणि पुणे ग्रामीणमध्ये १७ रुग्ण आढळले आहे. आज नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील ४ जणांचा समावेश आहे. तर  २६ पैकी १९ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. ( 5G ची प्रतीक्षा संपली! कधी आणि कोणत्या शहरांमध्ये सर्वात आधी होणार लॉन्चिंग ) तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले  आहे.  दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर शहरात आलेले हे 3 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते.  त्यामुळे या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. पुण्याच्या प्रयोगशाळेचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यात 3 पैकी 2 रुग्ण ओमायक्रॉन विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सध्या ते दोन्ही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 18 इतके आहेत. त्यापैकी दोन जण ओमायक्रॉन बाधित आहेत. या बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या