JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / अनाथांना आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, न्यूज18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश

अनाथांना आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, न्यूज18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश

अनाथांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

17 जानेवारी :  अनाथांना आरक्षण देण्याचा  ऐतिहासिक निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अनाथांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी हे आरक्षण आहे. न्यूज18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश मिळालं. न्यूज18 लोकमतनं  अनाथांच्या व्यथांना वाचा फोडली होती.  अनाथ मुलांच्या फरफटीवर न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डाॅ.उदय निरगुडकर यांनी बेधडकमध्ये ‘अमृताची गोष्ट’ या विषयाअंतर्गत चर्चा घडवून आणली होती. अनाथ आश्रमांमध्ये वयाच्या अठरा वर्षांपर्यंत राहणाऱ्या तरुण मुला मुलींची त्यानंतर प्रचंड फरफट होते. भवितव्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. अमृताची गोष्ट… जाती पातीच्या अस्मितेच्या सगळा गदारोळ सुरु आहे… त्यात अमृताचा आपल्या अस्तित्वासाठी जगाला एक आर्त सवाल आहे… माझी जात कोणती? अमृता… नकळत्या वयात आईची सावली गेली. मग जन्मदात्यानच डोक्यावरचं आभाळ काढून घेत अनाथ केलं. गोव्याच्या अनाथाश्रमात सोडलं.. तेव्हापासून समाजाची उपेक्षा आणि अवहेलनेचं ही अमृता विष पितीय. अमृता १८ वर्षांची झाली तेव्हा अनाथाश्रमानं सांगितलं यापुढे तुझी वाट तू शोधायची… अनाथश्रमाचीही सावली गेली. अमृता आयुष्यात दुसऱ्यांदा अनाथ झाली. मग पुणे, अहमदनगर या शहारांचे रस्ते.. फुटपाथ…आणि स्टेशनवर तिच्या भविष्याचा शोध सुरू झाला. पण तिनं हार मानली नाही. लहानमोठी कामं करत तिनं शिक्षण पूर्ण केलं. त्यात काही जणांनी दिला मदतीचा हातही दिला. पडेल ते काम करुन ती शिकली. स्वतच्या पायावर उभं राहाण्यासाठी धडपत राहिली. एमपीएससीची परीक्षा पासही झाली पण… जात माहीत नसल्यानं हातातून नोकरी गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या