JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / यापुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, शरद पवारांचा थेट इशारा

यापुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, शरद पवारांचा थेट इशारा

‘यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले, तिन्ही पक्षाचे नेते पत्र देऊन आले. पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही’

जाहिरात

राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही,

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी  (MLAs appointed by Governor) गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता या पुढे  12 आमदारबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते. पण, आता ‘शहाण्याना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (sharad pawar) कडक इशारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून राज्यपालांना कडक इशारा दिला आहे. राज्यपालांनी पुण्यात बोलत असताना राज्य सरकारला आवश्यकता नाही, असा टोला लगावला होता. त्यावरून शरद पवारांनी आपल्या शैलीत सणसणीत उत्तर दिले आहे. ‘यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले, तिन्ही पक्षाचे नेते पत्र देऊन आले. पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही, असा सणसणीत टोला पवारांनी राज्यपालांना लगावला. पुलावर रक्ताच्या थारोळीत तडफडत राहिला; चायनीज मांज्यामुळे बुलेटस्वाराचा मृत्यू तसंच, ‘आता ‘शहाण्याना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असा थेट इशाराच पवारांनी दिला. तर, राज्यसभेत महिला खासदारांना झालेली धक्काबुक्की, पेगसेस आणि कृषी कायदे रद्द करा, पेट्रोल डिझेल ची महागाई कमी करा या मागण्या होत्या. केंद्र सरकारचं म्हणणं होतं की आम्ही चर्चा करू पण केंद्र सरकारच्या वतीने कुठेही लेखी पत्रिकेत हे नमूद केलं नाही. अशा  परिस्थितीत त्यांनी विमा विधेयक आणलं. याला आमचा विरोध होता. या गोंधळात सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली. संसदेच्या इतिहासात असा प्रकार आजपर्यंत घडला नाही. संसद सदस्यांवर हा एक प्रकारचा हल्ला होता, अशी टीकाही पवारांनी केली. टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने पळवली बाईक, एक तास वाट पाहून मालकाची तक्रार 7 मिनिस्टर मीडिया समोर भूमिका मांडतात म्हणजे यातून केंद्र सरकारची बाजू कमकुवत आहे हे सिद्ध होते. 40 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा  ताफा आणने हे लोकशाही च्या दृष्टीने घातक आहे, असंही शरद पवार म्हणाले. ‘पाकिस्तान , चायना असताना अफगाणिस्तान ही भारताची नवी डोकेदुखी बनेल. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यात परिस्थिती बदलत आहे, आता आपल्या परराष्ट्र धोरणाची कस लागेल, असंही पवार म्हणाले. राज ठाकरेंना सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यापासून सामाजिक वेगवेगळे अंतर्गत वाद वाढले आहेत. सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांना राज ठाकरे यांच्या या विधानावर विषयी विचारले असता ‘राज ठाकरे यांना फार सल्ला काही देऊ शकत नाही पण राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी जे लिखाण केले आहे ते वाचावे’ असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या