JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ना पुरावा ना साक्षीदार; मुंबईतील विवाहितेच्या हत्येचं उलगडलं गूढ; UPमधून तिघांना अटक

ना पुरावा ना साक्षीदार; मुंबईतील विवाहितेच्या हत्येचं उलगडलं गूढ; UPमधून तिघांना अटक

Murder in Mumbai: मुंबईजवळील भाईंदर (Bhayandar) परिसरात गेल्या आठवड्यात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती. कोणताही सबळ पुरावा आणि साक्षीदार नसताना पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 ऑगस्ट: मुंबईजवळील (Mumbai) भाईंदर (Bhayandar) परिसरात गेल्या आठवड्यात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या (Married Woman Murder)करण्यात आली होती. ही हत्येची घटना समोर आल्यानंतर खऱ्या आरोपींना शोधून काढणं पोलिसांसमोर एक आव्हानच बनलं होतं. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. मात्र ही हत्या नेमकी कोणी केली, याच गूढ बनलं होतं. कोणताही पुरावा अथवा साक्षीदार नसल्यानं मारेकरी शोधून काढणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. पण पोलिसांनी हार मानली नाही. घटनेचा तांत्रिक तपास केला असता गुन्ह्याचे  धागेदोरे उत्तर प्रदेशापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यांतून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विजय चौहान (30), सुधीरकुमार तुलसी चौहान (19) व मुन्नी कुलदीप चौहान (32) असं अटक केलेल्या तीन आरोपींची नावं असून त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. कोणताही पुरावा हाती नसताना, केवळ तांत्रिक पद्धतीनं तपास करत पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं आहे. हेही वाचा- गर्लफ्रेंडला बाथटबमध्ये बुडवून निर्दयीपणे मारलं, पोलिसांना सांगितलं अजब कारण सुमनदेवी लाला शर्मा असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. त्या भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोलानगर येथील रहिवासी आहेत. याठिकाणी त्या आपला पती लाला शर्मा आणि भावासोबत वास्तव्याला होत्या. दरम्यान 21 जुलै रोजी पती आणि भाऊ नेहमी प्रमाणे रबर कंपनीत कामाला गेले होते. दुपारच्या सुमारास सुमनदेवी याचं आपल्या पतीशी बोलणं देखील झालं होतं. हेही वाचा- पुण्यात बस प्रवाशांकडून सव्वा कोटी लुटणारे तिघे अटकेत, 72 तासांत दरोड्याचा उलगडा पण 21 जुलै रोजी पती लाला शर्मा जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांच्या घराच्या लाइट बंद होत्या. दार उघडून त्यांनी आत प्रवेश केला असता, सुमनदेवी या अंथरूणावर निपचित पडल्या होत्या. तर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. तसेच सुमनदेवी यांच्या अंगावरील दागिने आणि अन्य  मौल्यवान वस्तू घरातून गायब होत्या. लाला यांनी आपल्या पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्या काही जाग्या झाल्या नाहीत. यांनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं लाला यांच्या निदर्शनास आलं. या प्रकरणी लाला यांनी तातडीनं भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हेही वाचा- Instagram वरील मित्राने केला घात; अश्लील चित्रण करत तरुणीकडून उकळले 58हजार रुपये चोरट्यांनी सुमनदेवी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कुडी आणि नाकातील नथ या दागिन्यांसह तीन मोबाईल हँडसेट, एटीमएम कार्ड आणि साऊंड बॉक्स असा एकूण 35 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. यानंतर पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना केवळ तांत्रिक तपासाच्या आधारावर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास भाईंदर पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या