JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत IMD चा ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाची शक्यता, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार

मुंबईत IMD चा ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाची शक्यता, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार

गेल्या आठवड्यात मान्सून हलक्यात गेला असला तरी या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहिले असून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात अधूनमधून पाऊस पडत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाच्या पावसासह आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट जारी केल्याची माहिती हवामान विभागाने आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये दिली आहे. ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिक आणि प्रशासनाने सावध राहणे आवश्यक आहे. येत्या दोन किंवा तीन दिवसांत शहरात सुमारे 130 मिमी पाऊस पडू शकतो, जो मुंबईच्या मानकांनुसार चिंताजनक नाही, परंतु त्यामुळे पाणी साचू शकते, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागात आठवड्याच्या शेवटीही हलक्या सरी बरसल्या. इतर उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईत अधिक पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात मान्सून हलक्यात गेला असला तरी या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहिले असून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. हे वाचा -  MLC Election : अजितदादांनी केलं डॅमेज कंट्रोल, ‘ते’ आमदार अखेर मतदानाला पोहोचले राजधानी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊन एक आठवडा उलटून गेला असताना, या कालावधीतील बहुतांश भागात पाऊस कमी झाला आहे. पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘चांगली’ श्रेणीत आहे. आज सकाळी, एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) या सरकारी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार AQI सकाळी 8:45 वाजता 29 होता. हे वाचा -  MLC Election UPDATES : फडणवीसांची पहिली खेळी पूर्ण, भाजप आमदारांची मोहिम ‘फत्ते’ भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पुढील पाच दिवस किंवा 22 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार, शनिवार ते बुधवार (जून 18-22) दक्षिण कोकण आणि गोव्यात आणि सोमवार ते बुधवार (20-22 जून) मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अचानक मुसळधार सरींचा अंदाज आहे. दरम्यान, बहुप्रतीक्षित नैऋत्य मोसमी पाऊस आज गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या