JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Shri Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरांचं भक्तांसाठी दार खुलं, बाप्पाच्या दर्शनासाठी नवी नियमावली जारी

Shri Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरांचं भक्तांसाठी दार खुलं, बाप्पाच्या दर्शनासाठी नवी नियमावली जारी

Shri Siddhivinayak Temple: राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून घटस्थापनेच्या मूहूर्तावर म्हणजेच आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑक्टोबर: Shri Siddhivinayak Temple: तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. आजपासून राज्यातल्या जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणारेय. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून घटस्थापनच्या मूहूर्तावर म्हणजेच आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली झाली आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर (Shri Siddhivinayak Temple), महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर सकाळी उघडण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पार्थ पवार आणि जयंत पाटील, सुनिल केदारे यांनी आज सिध्दीविनायक मंदिरात (Shri Siddhivinayak Temple) जाऊन गणपतीचं दर्शन घेतले.

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे आजपासून सामान्य भक्तांसाठी खुले झाले आहेत. दरम्यान यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत.श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या अॅपवर भक्तांना प्री-बुकिंग क्यूआर कोडद्वारेच गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. दर तासाला फक्त 250 यात्रेकरूंना क्यूआर कोड दिला जाईल.

काय आहे मुंबई पालिकेची नियमावली मुंबई पालिका क्षेत्रांतील सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या ही त्या धार्मिक स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं संपूर्ण पालन करणं आवश्यक असणार आहे. सरकारनं वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं अनिवार्य असेल. ब्रेक द चेन अंतर्गत धार्मिकस्थळं खुली करण्याकरिता सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पालिका क्षेत्रांतही पुढील आदेशांपर्यंत जशाच्या तशा लागू असणार आहेत, असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यांनी स्पष्ट केलं आहे. धार्मिक स्थळांमध्ये गेल्यानंतर वरीलपैकी कोणत्याही आदेशांची आणि नियमांची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीनं टाळाटाळ केली तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई होणार असल्याचंही इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे. हेही वाचा-  दिड वर्षांनंतर उघडले मंदिराचे दरवाजे…राज्यात भक्तिमय वातावरण, शिर्डीतील काकड आरतीचा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीनं सरकारच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ किंवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60 आणि भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या