मुंबई 22 जून : मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी (Fake Threats via Email to Bomb Mantralaya) देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ई-मेलद्वारे त्यानं ही धमकी दिली होती. पुण्यात घोरपडीमधून या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात देण्यात आलं आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश शिंदे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. काकांच्या अंत्यविधीसाठी येणं तरुणाला पडलं महागात; दोघे पोलिसांच्या जाळ्यात सोमवारी संध्याकाळी शैलेशनं हा मेल केला होता. मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं त्यानं गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळी हा मेल आल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला, मात्र याठिकाणी कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जगातील मोठ-मोठ्या मेट्रो मार्गालाही मागे टाकले मुंबई मेट्रो; यंत्रणा थक्क करणारी मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. सध्या शैलेश मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर त्याच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करत त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. शैलेशनं मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं हा मेल पाठवला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.