JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / प्रेयसी सारखी करायची पैशांची मागणी, पुरवण्यासाठी प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल, उत्तर प्रदेशातून अटक

प्रेयसी सारखी करायची पैशांची मागणी, पुरवण्यासाठी प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल, उत्तर प्रदेशातून अटक

Mumbai Bhandup murder news इमरान यानेच महिलेची हत्या केली असल्याची माहिती तरुणीने दिली. त्यानंतर भांडुप पोलिसांनी उत्तर प्रदेशातून इमरानच्या मुसक्या आवळल्या.

जाहिरात

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : प्रेयसी सारखी पैशांची मागणी करत होती म्हणून तिला पैसा पुरवण्यासाठी एका तरुणानं थेट एका वृद्धेची हत्या (Young man murdered old lady to give money to his Lover) केली. तब्बल महिनाभरानंतर भांडुप (Bhandup) पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे. त्यानंतर आरोपीचा माग काढत त्यालादेखिल अटक केली आहे. आरोपीनं 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करत तिचे दागिने आणि घरातील मौल्यवान वस्तुंची चोरी केली होती. सखोल तपासानंतर पोलिसांना याचा सुगावा लावण्यात यश मिळालं. (Mumbai Bhandup murder news) (वाचा- क्या हुवा तेरा वादा..! चंद्रपूरची दारुबंदी उठवल्याने चित्रा वाघ यांची टीका ) भांडुपच्या फुगेवाला कंपाउंड परिसरामध्ये 15 एप्रिल रोजी 70 वर्षीय रतन जैन या वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. महिलेच्या गळ्यातील आणि घरातील मौल्यवान वस्तू देखील चोरीला गेल्या होत्या. पण महिनाभरापासून पोलिसांना या हत्येचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी तपासासाठी पथकं तयार केली. जवळपास हजारावर संशयितांची चौकशीही केली. पण काहीही पुरावा मिळत नव्हता. दरम्यान तपासात पोलिसांना याच परिसरात राहणारा इमरान मुन्ने मलिक 24 वर्षांचा तरुण घटना घडली तेव्हापासून गायब असल्याचं समजलं. पोलिसांनी या दिशेनं तपास सुरू केला. तांत्रिक तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तरुणाची प्रेयसी असलेल्या दिपाली राऊत हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दिपालीच्या चौकशीदरम्यान सर्व सत्य समोर आलं आणि प्रकरणाचा उलगडा झाला. इमरान यानेच महिलेची हत्या केली असल्याची माहिती तरुणीने दिली. त्यानंतर भांडुप पोलिसांनी उत्तर प्रदेशातून इमरानच्या मुसक्या आवळल्या. (वाचा- ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात, फडणवीस म्हणाले, आता तरी नाकर्तेपणा सोडा ) या खुनाच्या कारणाचा शोध घेताना समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक होती. तरुणाची प्रेयसी सतत त्याच्याकडे पैसे मागायची. तिला देण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. दरम्यान मृत वृद्ध महिला रतन या घरात एकट्याच राहत असल्याचं इम्रानला माहिती होतं. त्यामुळं त्यांची हत्या करून लुटण्याचा कट इमरानवं रचला. त्यानंतर रतन हिच्या घरी पैसे देण्यासाठी जाण्याचा बहाणा करत संधी मिळताच तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आणि तिच्या घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल त्याने लंपास केला. प्रेयसीच्या मदतीने त्याने चोरी केलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावली. पण पोलिसांच्या कचाट्यातून ते वाचू शकले नाहीत. केवळ प्रेयसीच्या गरजा भागवण्यासाठी पैशासाठी अशाप्रकारे वृद्धेचा खून केल्याचा प्रकार घडल्यानं परिसरातही खळबळ पसरली आहे. प्रकरणाचा छडा लावणाऱ्या भांडपु पोलिसांचंही कौतुक केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या