JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Crime: मोबाइल चोरताना रंगेहात पकडलेल्या चोरट्याची निर्घृण हत्या, मुलुंडमधील घटना

Mumbai Crime: मोबाइल चोरताना रंगेहात पकडलेल्या चोरट्याची निर्घृण हत्या, मुलुंडमधील घटना

Mumbai youth beaten to death by four people: चोरी करताना रंगेहात पकडल्याने एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरी करताना रंगेहात पकडलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण (youth beaten by mob) करण्यात आली. जमावाने केलेल्या या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पूर्व उपनगर असलेल्या मुलुंड (Mulund) येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणातील सर्वच्या सर्व चारही आरोपींना पोलिसांनी अटक (Police arrest all four accused) केली आहे. लाकडी दांडक्याने मारहाण मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील अमरनगर भागात ही घटना घडली आहे. बुधवारी (8 जून) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमरनगर येथे हा प्रकार घडला. आरोपी मोबाइल चोरी करत असल्याचं पाहून त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर संतप्त जमावाने त्या आरोपीला लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. वाचा :  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत आरोपी हा गंभीर जखमी झाला. त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमरनगरमधील घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर या प्रकरणात मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. बीडमध्ये चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना बेदम मारहाण बीडमध्ये चोरीच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेल्यावर्षी समोर आली होती. जमावाने केलेल्या या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. मात्र त्या दोघा गंभीर जखमींचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही घटना केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री गावात घडली होती. शिवाजी नामदेव काळे ( वय 20 रा. टोकणी ता. इटकूर जि. उस्मानाबाद) असं मयत तरुणाचं नाव आहे. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे गंभीर जखमी झाले होते. हनुमंत पिंपरी येथे आले असताना चोर समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात शिवाजी नामदेव काळे याचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे जखमी झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या