JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : मुंबईत तब्बल दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली

BREAKING : मुंबईत तब्बल दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली

मुंबईच्या अंधेरी येथील एका इमारतीत लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रमाकांत तिवारी, प्रतिनिधी मुंबई, 13 डिसेंबर : मुंबईच्या अंधेरी येथील एका इमारतीत वाईट घटना घडली आहे. संबंधित इमारतीतील लिफ्टचा अपघात झाला आहे. ही लिफ्ट तब्बल दहावा मजल्यावरुन खाली कोसळली आहे. या अपघातात चार ते पाच जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अंधेरीच्या महाकाली दर्शन सोसायटीत घडली आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली आहे. अपघात घडला त्यावेळी लिफ्टमध्ये चार ते पाच जण होते. ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सोसायटीतील काही नागरिकांमध्ये भीती निर्माण झालीय. लहान मुलंही घाबरले आहेत. दरम्यान, सोसायटीतील काही नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. हेही वाचा :  आज मध्यरात्रीनंतर होणार जेमिनीड उल्कावर्षाव! पृथ्वीला धोका तर नाही?

अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू सुरु

अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने लिफ्टमध्ये अडकलेल्यांना काही जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके जखमी कितीजण झालेत त्याची ठोस माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय अग्निशमन दलाच्या जवानांकडून अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. लिफ्टच्या या दुर्घटनेत आणखी कोणी अडकलेलं नाही ना? याची शहानिशा ते करत आहेत. पण या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा :  ज्यांच्या हातात डमरु आहे त्यांचं काशीत सरकार आहे : नरेंद्र मोदी

अपघातामागे नेमकं कारण काय?

एखाद्या हायप्रोफाईल सोसायटीची लिफ्ट अशाप्रकारे कशी कोसळू शकते, नागरिकांचा जीव इतका स्वस्त आहे का? लिफ्टमध्ये अचानक असा कोणता तांत्रिक बिघाड झाला की थेट दहाव्या मजल्यावरुन खाली पडली? तसेच त्या लिफ्टचा अनेक दिवस मेन्टेनन्स सोसायटीकडून करण्यात आला नव्हता का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मुंबई पोलीस या अपघातामागील कारण शोधत आहेत. पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या