मुंबई, 07 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. पण आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. सुनील पाटील याने मुंबई पोलिसांकडे जाऊन आपली बाजू मांडली. पोलिसांनी सुनील पाटील याचा जाब नोंदवला आहे. तसंच, माझी खोटी बदनामी करणाऱ्या भाजपचे नेते मोहित कंबोज यांची चौकशी करा, अशी मागणीच पाटील याने केली आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज (BJP Mohit kambol) यांनी सुनील पाटील (Sunil Patil) याचा उल्लेख केला होता आणि गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज संध्याकाळी सुनील पाटील उर्फ सुनील भटू चौधरी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. सुनील पाटीलला हजर होण्याचे विशेष पथकाचे आदेश दिले. झोन 1 कार्यालयात सुनील पाटीलची चौकशी सुरू आहे. सुनील पाटीलने त्याच्याकडील व्हॉट्स अप चॅट आणि रेकॉर्डिंग, विशेष पथकाला दिल्याची माहिती समोर आली आहे. UPDATE : पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जखमी ‘मी या प्रकरणाचा सूत्रधार नाही. माझी बदनामी केली जात आहे, असा दावा सुनील पाटील याने केला. जर पुरावे होते तर सादर का केले नाही ? असा सवाल चौकशी अधिकाऱ्यांनी विचारला. यावर पाटील म्हणाला की, ‘या प्रकरणात मला गोवलं जाईल ही भीती होती असं पाटील म्हणाला. ‘ठुमक्या’मधून वेळ मिळाला तर बीडकडे बघा, विनायक मेटेंचा धनंजय मुंडेंना टोला सुनील पाटीलचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू असून जबाब नोंदवून त्याला घरी जाऊ देण्याची शक्यता आहे. चौकशीदरम्यान, माझी खोटी बदनामी करणाऱ्या मोहित कंबोज यांची चौकशी करा, अशी मागणी सुनील पाटील याने विशेष तपास पथकाकडे केली आहे. तब्बल डी तासांपासून जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.