कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
मुंबई, 17 एप्रिल: मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची पोलखोल करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. घोडपदेव येथे स्वतः कोरोना चाचणी करून आलेल्या एका कुटुंबात एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर बिल्डिंगमधील रहिवाशांनी राज्य सरकार, महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनाला कळवलं. परंतु 15 तासांपेक्षा जास्त काळ लोटला गेला असून तरीही संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणीही आलेलं नाही. दुसरीकडे बिल्डिंगमधील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन अथक प्रयत्न करत असल्याचं सांगत आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाची माहिती देऊन 15 तासांपेक्षा जास्त काळ लोटला गेला असताना संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणीही आलं नाही. महापालिकेच्या अशा गलथान कारभाराबाबत घोडपदेव भागात रोष व्यक्त होत आहे. हेही वाचा.. भाडेकरुंना दिलासा, राज्य सरकारने घरभाड्याबाबत घरमालकांना दिले आदेश दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्यावर गेला आहे. तर मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहे. राज्यात टास्क फोर्सची स्थापना महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणाऱ्यां मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष दल (टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे. या टास्क फोर्स मधील तज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया , डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव , डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडीत या तज्ञांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे. हेही वाचा.. Good News:सप्टेबरपर्यंत येणार कोरोना लस, 100 देशाचे वैज्ञानिक गुंतले संशोधनात राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 297 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5664 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 20.50 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे संपादन- संदीप पारोळेकर