भिवंडी, 21 सप्टेंबर : भिवंडी परिसरात पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास पटेल कंपाऊंडमधील 3 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. साधारण या इमारतीमध्ये 21 ते 25 कुटुंब राहात होती. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली साधारण 80 ते 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच एका चिमुकल्यानं मात्र मृत्यूला हुलकावणी दिली आहे. या चिमुकल्यानं आलेल्या मृत्यूला हुल देत वाचला आहे. या चिमुकल्याला NDRF च्या टीमनं रेस्क्यू केलं आहे. या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. 80 ते 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असताना या चिमुकल्यानं मात्र मृत्यूवर मात करून बचावला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतात तसंच या लहान मुलाच्या बाबतीत घडलं. NDRF च्या पथकानं या चिमुकल्याला रेस्क्यू करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
हे वाचा- नाणार प्रकरण : ‘देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री म्हणून अधिसूचना काढतील’ या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहेत. भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत 40 वर्ष जुनी आहे. सध्या NDRF, पोलीस आणि ठाण्यातील तज्ज्ञांची विशेष टीम घटनास्थळी पोहोचली आहे. 24 ऑगस्टला महामध्ये 5 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं.