JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / COVID19: डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

COVID19: डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

हा निर्णय फक्त कोविड रुग्णांशी संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. रुग्णालयातील तांत्रिक, शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू नसेल.

जाहिरात

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 मे: कोविड 19 झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. या कर्मचारी आणि डॉक्टरांना आठवड्यात दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांना आता 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र शासनाने सुचवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 7 दिवस काम 7 दिवस सुट्टी हे सूत्र सांगितले होते. मात्र ते सध्यातरी शक्य नसल्याने हा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यामुळे एकाचवेळी 67% कर्मचारी कामावर आणि 33% रजेवर असतील असंच केंद्र शासनाचं म्हणणं होतं. या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शेवटी या सूत्रानुसार सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता सलग पाच दिवस काम करा आणि 2 दिवस सुट्टी घ्या. असा मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे. यात आठवड्याच्या सुट्टीचा समावेश नसेल. शिवाय हा निर्णय फक्त कोविड रुग्णांशी संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. रुग्णालयातील तांत्रिक, शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू नसेल.  त्यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शिवाय ज्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वतःचे नाव नोंदवलेले आहे त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशा डॉक्टरांनी त्यांच्या त्याच पदावर आणि त्याच पगारावर कायम राहून काम करायचे आहे. सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या

  या डॉक्टरांचा हा संपूर्ण कालावधी बॉन्डचा कालावधी म्हणून गणला जाईल. डॉक्टरांन प्रमाणेच परिचारिकांना सुद्धा बॉन्डचा यांचा कालावधी असतो. त्यांना सुद्धा या निर्णयाचा फायदा होणार आहे. कोविड च्या काळात दिलेली सेवा हा बॉण्ड चा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. मुंबईतील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कोविड १९ च्या कामासाठी घेतले जावे असंही म्हटलं आहे.

मुंबईत आतापर्यंत 800 मृत्यू, रुग्णसंख्या 22583; पुण्यातही रुग्ण वाढले स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या परिचारिकांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या ठरलेल्या मानधना व्यतिरिक्त वीस हजार रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. हा निर्णय सर्व शासकीय, महापालिका आणि खाजगी परिचारिका प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांवर लागू असेल.लवकरच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरी सुरू केली जाणार आहे जेणेकरून उपस्थिती सुरळीत व्हावी हा प्रयत्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या