JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / बापरे! मुंबईतील रस्त्यांसाठी BMC कडून 21,000 कोटींहून अधिक खर्च, खड्डे मात्र जैसे थे...

बापरे! मुंबईतील रस्त्यांसाठी BMC कडून 21,000 कोटींहून अधिक खर्च, खड्डे मात्र जैसे थे...

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात खड्ड्यांचा मुद्दा गाजणार असं दिसून येतंय

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै : मान्सूनची सुरुवात होताच मुंबईत पाणी साचणे आणि रस्त्यांवर खड्ड्यांच्या समस्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईची हिच अवस्था असूनच खड्डे आणि पाणी भरण्याच्या समस्येवर उत्तर सापडू शकलेलं नाही. यासर्वात एक धक्का देणारं वृत्त समोर आलं आहे. एका आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. यानुसार पालिकेने गेल्या दोन दशकात मुंबईतील खड्डे भरण्यासाठी तब्बल 21,000 कोटींहून अधिक खर्च केला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे इतका खर्च करूनही अद्याप मुंबईतील रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. (More than Rs 21000 crore was spent by BMC for roads in Mumbai) भाजप आमदाराने याबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला होता. यामध्ये सांगितल्यानुसार, 1997 ते आतापर्यंत पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी, बांधकामासाठी आणि रस्त्यांवरुन खड्डे भरण्यासाठी 21,000 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.2013 ते 2014 या एका वर्षात सर्वाधित म्हणजे 3.201 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलं. काही वर्षांपूर्वी मुंबईत रोड घोटाळा समोर आला होता. ज्यानुसार पालिकेने 1997 या वर्षापासून आतापर्यंत रस्ते बांधकाम, खड्डे भरणे, रस्ते बांधकाम यासाठी 21000 कोटी हून अधिक खर्ज केला आहे. 2013 ते 2014 या एका वर्षात 3201 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हे ही वाचा- आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा पालिका आणि शिवसेनेवर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रत्युत्तर देताना शिवसेना म्हणाली की, जेव्हा ते 25 वर्षे युतीत होते, तेव्हा हे खड्डे हा दिसले नाही आणि आता पालिका निवडणुकीपूर्वी भाजपला खड्ड्यांवर (potholes) राजकारण करावयाचे आहे. खड्ड्यांचा प्रश्न कधी सुटणार मोठ मोठं खड्डे हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. पावसात तर अशा खड्ड्यांतून प्रवास करणं म्हणजे संकटाचा सामना करण्यासारखचं आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. अनेकांनी यावर गाणी केली, काही नागरिक तर खड्डे बुजविण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले, किती मीम्स आले तरी अद्याप गेल्या अनेक वर्षांत खड्ड्यांचा विषय काही संपू शकला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या