JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / केरळात Monsoon आलाचं नाही? भारतीय हवामान विभागाच्या दाव्यावर स्कायमेटकडून प्रश्नचिन्ह

केरळात Monsoon आलाचं नाही? भारतीय हवामान विभागाच्या दाव्यावर स्कायमेटकडून प्रश्नचिन्ह

केरळात मान्सून दाखल झाल्याची भारतीय हवामान खात्याने घोषणा केली. मात्र, या घोषणेवर आता स्कायमेटकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे : मान्सून केरळमध्ये (Monsoon arrives in Kerala) दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागा **(IMD)**कडून दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं. मान्सूनचं आगमन झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना एक दिलासा मिळाला. तसेच आता महाराष्ट्रात मान्सून (Monsoon in Maharashtra) कधी दाखल होतो याची सर्वजण वाट पाहू लागले. पण त्याच दरम्यान आता स्कायमेटने (Skymet) भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मान्सून खरंच केरळात दाखल झाला आहे की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. भारतीय हवामान खात्याने सर्व तपासणी न करता मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. एका दिवसाच्या निरीक्षणाद्वारे घोषणा करणं अयोग्य आहे असं खाजगी हवामान अंदाज वर्तक स्कायमेटने म्हटलं आहे. मात्र, आयएमडीने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बिझनेस स्टँडर्ड ला सांगितले, “आम्ही विज्ञानाशी कधीही तडजोड करत नाही. कारण आयएमडी फक्त खाजगी हवामान शास्त्रज्ञच नाही तर जगभरातील अनेक नामांकित संस्थांद्वारे फॉलो केले जातात. आम्ही आमच्या वैज्ञानिक अंदाजासाठी ओळखलो जातो.” वाचा :  उन्हाचा फटका, जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात, खाजगी हवामान अंदाज वर्तक संस्था असलेल्या स्कायमेटने म्हटले, आयएमडीने रविवारी केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्याचं म्हटलं. हे सांगताना गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग आणि ओएलआर यावर आधारित निर्णय घेतला. पण जेव्हा पावसाचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्त्वाचा आणि दृश्यमान याची आकडेवारी दर्शवते की मान्सूनची सुरुवात घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही. सुरुवातीच्या फक्त एका दिवसासाठी म्हणजेच 29 मे रोजीचे निकष पूर्ण केले. एक दिवस आधी (28 मे) आणि दुसऱ्या दिवशी (30 मे) या दिवशी नियुक्त केलेल्या स्थानकांपैकी केवळ 40 टक्के स्थानकांनी पावसाचे निकष पूर्ण केले असंही स्कायमेटने म्हटलं आहे. काय होता आयएमडीचा अंदाज अंदमानात 16 मेला पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर साऊथ इस्टेट मान्सून वाऱ्यांची दिशा लक्षात घेता सर्वसाधारण अंदाजानुसार 5-10 जून पर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये 29 मे 2022 रोजी मान्सून सुरू झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान हवामान खात्याकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सून दाखल होण्यापूर्वी पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची समुद्रसपाटीपासून खोली 4.5. किमी पर्यंत असते. दरम्यान हे वाऱ्यांचा वेग वाढून तो 25-35 kmph गेल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या