मुंबई 27 जून : राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. अशात आता नुकतंच राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर रविवारी घरी परतले आहेत. यानंतर लगेचच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी बराच वेळी त्यांची फोनवर चर्चा झाली. मात्र, यात राजकीय चर्चा काय झाली, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. BREAKING : बंडखोर आमदारांना कोर्टाकडून मुभा, 12 जुलैपर्यंत कारवाई टळली अशात आता आज राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीबाबतही चर्चा झाली. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिंदे गटाकडे दोन-तृतियांश आमदार असतील तर त्यांना भाजप किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पण यात नवा ट्विस्ट समोर आला आहे. शिंदे गटाला विलीन व्हावं लागलं, तर त्यांच्याकडे मनसेचा पर्याय असू शकतो का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंच्या मनसेकडे सध्या राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. याबद्दलही बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी या मुद्द्याचं खंडन केलेलं नाही. मात्र सध्या यावर बोलणं टाळलं. ‘उद्या ईडीच्या चौकशीला हजर राहू शकणार नाही; पण मी पळ काढणारा नाही’ : संजय राऊत दरम्यान मनसेच्या अमेय खोपकर यांचं ट्विटही सध्या चांगलंच चर्चेत आहे. आपल्या ट्विट्समधून त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी शिवसेना पक्षाचं नाव शिल्लक सेना असं ठेवण्याचा खोचक सल्ला दिला आहे. याशिवाय आपल्या आणखी एका ट्विटमधून त्यांनी आदित्य ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय आहे, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.