JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...तर Olympic खेळाडूंना कोणत्या अधिकारानं शुभेच्छा देता? मनसेचा शिवसेनाला बोचरा सवाल

...तर Olympic खेळाडूंना कोणत्या अधिकारानं शुभेच्छा देता? मनसेचा शिवसेनाला बोचरा सवाल

मागील बऱ्याच वर्षांपासून दादर (Dadar) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात सुरू असेलेलं धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र (Archery Training Center) बंद आहे. हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

दादर येथील धनुर्विद्या केंद्र पुन्हा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट: मागील बऱ्याच वर्षांपासून दादर (Dadar) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात सुरू असेलेलं धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र (Archery Training Center) बंद आहे. हे धनुर्विद्या केंद्र पुन्हा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. याबाबतच परिपत्रक मनसेचे (MNS) महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. या पत्रातून देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारात सामील झाल्यापासून सेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात एक धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू होतं. याठिकाणी अनेक खेळाडू धनुर्विद्याचा सराव करत असत. दरम्यान एकेदिवशी प्रशिक्षण सुरू असताना एक बाण चुकून तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यात कुणालाही इजा झाली नाही. पण केवळ महापौरांच्या निवासस्थानात बाण पडल्याच्या कारणातून हे प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करावं अशी मागणी देखील देशपांडे यांनी केली आहे. हेही वाचा- अनिल परब यांच्या समर्थनात मुंबईत लागले बॅनर, शिवसैनिक म्हणतात… यावेळी देशपांडे यांनी धनुर्विद्या आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्हं असणारं धनुष्यबाण याची तुलना करत करत सेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. संबंधित प्रशिक्षण केंद्रात धनुर्विद्या शिकणारे खेळाडू सध्या अस्वस्थ असून त्यांना सरावाला जागा नाही. त्यामुळे आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आर्चरी क्लबनं स्थानिक आमदार, नगरसेविका आणि सभागृहनेत्यांशी पत्रव्यवहार केला होता, पण या मागणीला नेत्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. हेही वाचा- सेनेविरोधात राणे समर्थकांची डरकाळी; थोड्याच वेळात जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू खेळाडूंना प्रशिक्षण करण्यासाठी त्यांच्या हक्काची जागा मिळत नसेल तर ऑलिम्पिकमध्ये भारताला पारितोषिक कसं मिळणार? प्रशिक्षण केंद्र बंद पाडून खेळाडूंचं खच्चीकरण केल जात असेल तर ऑलिम्पिकमध्ये पद मिळवून देणाऱ्या खेळाडूना ‘वर तोंड’ करून शुभेच्छा देण्याचा कोणता अधिकार आहे? असा बोचरा सवालही देशमुख यांनी सेनेला विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या