JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ठाकरे सरकारचा खेळ खल्लास! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पत्र आलं समोर, 34 आमदारांच्या सह्या

ठाकरे सरकारचा खेळ खल्लास! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पत्र आलं समोर, 34 आमदारांच्या सह्या

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून : उद्धव ठाकरे (Uddhav  Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदेंच्या तावडीत असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचे कारण आले समोर शिंदे यांनी त्यानंतर झिरवाळ यांना नवं पत्र पाठवत सुनील प्रभू यांच्या नियुक्तील आव्हान दिलंय. सुनील प्रभू यांचा आदेश अवैध असून प्रतोदपदी भारत गोगावली यांची नियुक्ती केल्याचं शिंदे यांनी जाहीर केले आहे. शिंदे यांच्या या नव्य भूमिकेमुळे शिवसेनेतील ठाकरे विरूद्ध शिंदे संघर्ष तीव्र झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या