मुंबई, 7 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच विधानपरिषदेची निवडणूक (Maharashtra MLC Election 2022) होणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी (Maharashtra Legislative Council election) निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महन्यातच जाहीर झाला आहे. 20 जूनला 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार यावरुन जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावे (Shiv Sena candidates for MLC election) निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या या जागांसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित मानली जात आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप शिवसेनेकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पूर्नवसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा-कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे. वाचा : महाविकास आघाडी की भाजप? MIM ची मते कुणाच्या पारड्यात? इम्तियाज जलील यांनी म्हटलं… भाजपकडून प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल करत आहे. सदाभाऊ खोत यांनी अनेक आंदोलनातून कायम चर्चेत राहिले आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहे. सध्या ते विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या आमदारांचा संपला कार्यकाळ रामराजे निंबाळकर सुभाष देसाई प्रविण दरेकर प्रसाद लाड सदाभाऊ खोत संजय दौंड विनायक मेटे दिवाकर रावते