New Delhi: Prime Minister Narendra Modi being felicitated by Shiv Sena chief Uddhav Thackeray during a dinner meeting with National Democratic Alliance leaders in New Delhi, Tuesday, May 21, 2019, two days ahead of Lok Sabha polls results. (PTI Photo/Kamal Singh) (PTI5_21_2019_000171B)
मुंबई 24 डिसेंबर : मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतेय. हे प्रकरण मनुष्यबळ मंत्रालयात रखडलेलं आहे. मराठा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक संस्था आणि संघटनांनी केंद्र सरकारकडे मागणी केलीय मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठवलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्वत: पंतप्रधानांनी लक्ष द्यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 16 नोव्हेंबर 2013 रोजी राज्य सरकारने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने प्रस्ताव सादर केला होता मात्र हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातच प्रलंबीत आहे. त्यामुळे आता स्वत: पंतप्रधानांनीच या प्रकरणात लक्ष घालावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंची वाढू शकते डोकेदुखी, शिवसेना-राष्ट्रवादीच्या खात्यांवर काँग्रेसचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीनं पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय ? - ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात. - त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा. - त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे. - प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा. एकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रकारचे प्राचीन संदर्भ दिले आहेत.
अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली जातेय.