JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / अजॉय मेहता यांना पुन्हा 3 महिने मुदतवाढ, आता उद्धव ठाकरेंशीही सूर जुळल्याची चर्चा

अजॉय मेहता यांना पुन्हा 3 महिने मुदतवाढ, आता उद्धव ठाकरेंशीही सूर जुळल्याची चर्चा

मुख्य सचिव अजॉय मेहता यांना पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्याबाबतच्या राज्य सरकारच्या शिफारसीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई , 28 मार्च: राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतावढ दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मेहता यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अजॉय मेहता यांना 1 एप्रिल ते 30 जून अशी 3 महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजॉय मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही सूर जुळवून घेतल्याची प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशासकीय सेवेत दोनदा मुदतवाढ मिळणारे अजॉय मेहता हे पहिले मुख्य सचिव आहेत. हेही वाचा.. जबलपूर आर्मी बेस वर्कशॉपमध्ये भीषण स्फोट; जवान शहीद, तीन जखमी याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुख्य सचिव अजॉय मेहता यांना पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्याबाबतच्या राज्य सरकारच्या शिफारसीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. या आधीच निवडणूक कालावधीत मेहता यांना 6 महिने मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा मुदत वाढ मिळाली. मुख्यमंत्री छाकरे आणि मेहता यांचे सूर चांगले जुळले असल्याची पुन्हा चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सप्टेंबर 2019 मध्ये मेहता यांना 6 महिने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मार्च अखेरीस मुदत संपणार होती, मात्र पुन्हा मेहता यांना मुदतवाढ मिळाली आहे. हेही वाचा.. कोरोनापासून बचावासाठी सूट मिळेना, नर्सनी घातल्या कचऱ्याच्या पिशव्या; फोटो VIRAL या अधिकाऱ्यालाही दिली ठाकरे सरकारने मुदतवाढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएसआरडीसी एमडी राधेशाम मोपलवार यांनाही मुदतवाढ दिली आहे. मोपलवार आणि मेहता या दोन अधिकाऱ्यांशी खास जवळीक असलेले ठाकरे सरकारबाबत प्रशासनात चर्चा सुरु झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या