मुंबई, 09 फेब्रुवारी : मध्य रेल्वेवरील रूळ ओलांडताना लोकलला धडक होऊन लोको पायलटचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही घटना मध्य रेल्वेवरील विद्याविहार या मार्गावर घडली आहे. ही घटना घटना मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. लोको पायलट रामेश्वर मीना कर्तव्य बजावण्यासाठी एलटीटीला जात होते. त्यासाठी विद्याविहार येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकलची धडक मीना यांना बसली.
त्यानंतर, रेल्वे पोलिसांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना मृत घोषित केले. मीना यांना नुकतीच मोटरमनहून लोको पायलट अशी बढती मिळाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.
हे ही वाचा : Nashik Koyta Gang : बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत
लोकोपायलटची आत्महत्या
मुंबईत मुख्य लोको पायलटने लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या 57 वर्षीय मुख्य लोको पायलटने मुंबईच्या विलेपार्ले स्थानकावर लोकल ट्रेनसमोर रेल्वे ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. असे सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) अधिकाऱ्यानी मंगळवारी सांगितले. ही घटना 26 जानेवारी रोजी घडल्याचेही सांगण्यात आले.
हे ही वाचा : रूम बुक करून भारतीय जवानाचे भयानक कृत्य, मृतदेह पाहून पोलिसही हादरले
26 जानेवारीला घडलेली ही घटना रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मृत राकेशकुमार गौर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. गौर यांनी एवढे कठोर पाऊल का उचलले याचा तपास सुरू आहे. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्याने कधीही कामाच्या तणावाची तक्रार केली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.