JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आम्ही रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतो, परवानगीसाठी भाजप नगरसेवकांची BMC कडे धाव

आम्ही रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतो, परवानगीसाठी भाजप नगरसेवकांची BMC कडे धाव

सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेला पत्र दिलेला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 एप्रिल : मुंबईत (Mumbao) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन पाठोपाठ ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकाने निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट (Oxygen concentrator) खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील वार्ड क्रमांक 84 चे भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेला पत्र दिलेला आहे. अभिजीत सामंत यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तसेच रूग्णालयातील बीड मोठ्या प्रमाणावर भरलेले असल्यामुळे नागरिकांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत वाट बघावी लागते. IPL 2021 : आयपीएलसाठी आलेल्या मुरलीधरनला हृदयविकार, चेन्नईत एन्जियोप्लास्टी अशावेळी त्या नागरिकाचा जीव धोक्यात येऊ शकतो. नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट खरेदी करता आला तर किमान बेड मिळेपर्यंत त्या नागरिकांचा जीव वाचवता येणे शक्य होईल. म्हणूनच त्यांना त्यांच्या नगरसेवक निधीतून दहा लाख रुपये खर्च करून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट खरेदी करण्याची परवानगी द्यावी. कोरोना च्या पहिल्या लाटेच्या काळात के पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांनी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी एक याप्रमाणे 15 कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून दिले होते.‌ या कॉन्सन्ट्रेटच्या मदतीने या विभागातील तब्बल 250 लोकांना मदत करण्यात आली होती. अडचणीच्या काळी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चांगले उपयुक्त ठरले होते. त्यामुळे या फंक्शन ट्रॅक्टरची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे अशी माहिती  प्रशांत सपकाळ यांनी दिली आहे. ब्रुक फार्मावर गुजरातमध्येच काळाबाजार केल्याची केस, आव्हाडांचा पलटवार गेल्या वेळी या कॉन्सन्ट्रेटरचा चांगला वापर झाला होता. सध्या तर ऑक्सीजनचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक नगरसेवकांना फोन करतात आणि बेड मिळत नसल्याने नगरसेवक सर्वसामान्य नागरिकांना फारशी मदत करू शकत नाही. अशा परिस्थितीत नगरसेवकांना त्यांच्या निधीचा वापर करून असे कॉन्सन्ट्रेट खरेदी करून नागरिकांच्या वापरासाठी देता आले तर त्याचा उत्तम फायदा होऊ अशी प्रतिक्रिया अभिजित सामंत यांनी दिली आहे. हे कॉन्सन्ट्रेटर विजेवर चालणारे असून कुणाच्याही घरात किंवा वीज उपलब्ध आहे त्या ठिकाणी सहज चालू शकते. एका रुग्णाने वापरला की पुढच्या रुग्णांसाठी केवळ मास्क आणि त्याची नळी बदलावी लागते. त्यामुळे त्याचा फारसा खर्च होत नाही. असे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 50 हजारापर्यंत उपलब्ध होते.अभिजीत सामंत यांच्या मागणीबद्दल मुंबई महापालिका सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या