मुंबई, 25 मार्च : सचिन वाझे (Sachin Vaze) अटक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे पोलीस दलातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादाक माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. सफाई कर्मचारी ते सुपरस्टार अभिनेते; पाहा प्रकाश राज यांचा थक्क करणारा प्रवास पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला आहे. याबद्दलचा सीएस आपला संपूर्ण अहवाल हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. दरम्यान, 3 दिवसांपूर्वी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅप प्रकरणाचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. Mansukh Hiren प्रकरणी धक्कादायक माहितीसमोर, बेशुद्ध अवस्थेत फेकलं कळवा खाडीत! तर ‘रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेता फोन टॅप केले होते. महाविकास आघाडी सरकार बनवण्याचे काम सुरू होते. शुक्ला फोन टॅप करत होत्या, त्या भाजपासाठी काम करत होत्या, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या प्रकरणाची महाविकास आघाडी सरकारने गंभीर दखल घेतली असून चौकशी केली जाणार आहे.