JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

पुढील 24 तासांत उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट : शुक्रवारी दिवसभर मुंबई-ठाणे- नवी मुंबईसह उपनगरात पावसानं हजेरी लावली होती. तर शनिवारी पहाटेपासून मुंबईसह उपगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. कोकणात पुढच्या 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबईत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत 54.78 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. हे वाचा- नदीत अडकला वाळू नेणारा ट्रक, पुढे काय झालं पाहा VIDEO पुढील 24 तासांत उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना आणि मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुंबई- पुण्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं 90 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. पुढचे दोन दिवस पावसाचे असून विदर्भ आणि कोकणात मुसधार तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या