JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, पुढचे 4 दिवस असा आहे हवामानाचा अंदाज

कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, पुढचे 4 दिवस असा आहे हवामानाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे.

जाहिरात

त्यातच आता पावसाळा सुरु झाल्याने दरवर्षी उद्भवनाऱ्या साथीही येत असल्याने जास्त काळजी घ्येण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. मागच्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळ तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं हवामानात वेगानं बदल होत आहे शनिवारी संध्याकाळी मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये काही भागांत हलक्या तर काही परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. हे वाचा- कोरोनामुक्त झाल्यानंतर या 11 गोष्टींची काळजी घ्या, आयुष मंत्रालयाची सूचना 14 आणि 15 सप्टेंबर रोजी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रत मध्यम ते हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 16 सप्टेंबर रोजी विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये ऊन आणि पावसाच्या हलक्या सरी राहातील. मुंबईत मागच्या आठवड्यात उष्णता वाढल्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस पडल्यानं हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळाला आहे. हे वाचा- यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदींनीच सांगावे, राऊतांचा थेट सवाल अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या पावसानं जोर धरला आहे. राहाता तालुक्यातील केलवड येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या पावसानं मका आणि बाजरीची पिकं भुईसपाट झाली. डौलदार उभारलेलं सोयाबिनचं पिकंही पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे. केलवडमध्ये 25 मिनिटांत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या 25 वर्षात पाहिल्यांदाच असा पाऊस झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या