JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Ghatkopar Video : मुंबईकर थर्टी फस्टमध्ये गुंगले अन् घाटकोपर पाण्यात बुडाले, क्षणात गेला संसार वाहून VIDEO

Ghatkopar Video : मुंबईकर थर्टी फस्टमध्ये गुंगले अन् घाटकोपर पाण्यात बुडाले, क्षणात गेला संसार वाहून VIDEO

मुंबईच्या घाटकोपरमध्ये ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने 72 इंच जलवाहिनी फुटल्याने तेथे असणाऱ्या 400 घरांमध्ये पाणी शिरले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने त्या भागात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान 72 इंच जलवाहिनी फुटल्याने तेथे असणाऱ्या 400 घरांमध्ये पाणी शिरले होते. फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा वेग इतका जोरात होता की आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमधील साहित्यांसह काही वाहनेही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

हे ही वाचा :  एका तंबाखूच्या पुडीने उकललं महिलेच्या हत्येचं गूढ; पतीच निघाला आरोपी

घाटकोपर परिसरात अचानक रात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटली दरम्यान लोक घरात झोपलेले असताना ही घटना घडल्याने मोठा गोंधळ झाला होता. अचानक 72 इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला. या परिसरात पाणी साचल्याने महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

संबंधित बातम्या

या पाण्याचा दाब इतका जोरदार होता, की ते सुमारे 10 फुटांपर्यंत उसळत होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली. मात्र, पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितलं.

हे ही वाचा :  Sangli : पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर सिनेस्टाईल दरोडा! दगडफेक, चाकूच्या धाकाचा थरार

दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग अद्यापही कमी झालेला नाही. घराबाहेर पडणारे लोक पाण्याचा वेग लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहेत. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरश: घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या