JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 3 हॉस्पिटलने नाकारले, एकाने मागितले लाख रुपये, मुंबईत गर्भवती महिलेची वेदनादायी कहाणी

3 हॉस्पिटलने नाकारले, एकाने मागितले लाख रुपये, मुंबईत गर्भवती महिलेची वेदनादायी कहाणी

शासकीय रुग्णालयात जागा नाही आणि खासगी हॉस्पिटल जास्त पैसे मागत आहे, अशा परिस्थितीत हे दाम्यत्य अडकले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जून : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वच हॉस्पिटलमध्ये रुग्णांमुळे खचाखच भरलेली आहे. या परिस्थितीमुळे एका गरोदर महिला हॉस्पिटललाशी वणवण भटकावे लागले आहे. शेवटी जनरल फिजिशियनच्या मदतीने या महिलेची घरीच प्रसूती करण्यात आली. इंग्रजी दैनिक मिररने दिलेल्या वृत्तानुसार, साकीनाका येथील चांदिवली इथं राहणाऱ्या पूजा भिसे या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे या महिलेचा पती दत्तात्रय भिसे यांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. घाटकोपर येथील एका हॉस्पिटलमध्ये या महिला दाखल करण्यात आलं होतं. पण, या महिलेला ताप असल्यामुळे या हॉस्पिटलने त्यांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी सांगितले. पण त्याचवेळी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे या महिलेला घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण, राजावाडी हॉस्पिटलमध्येही बेड उपलब्ध नसल्यामुळे दाखल करता आले नाही. **हेही वाचा-** लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्नचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीची केली हत्या त्यानंतर गर्भवती महिला आणि तिचा पती हे जागृती नगरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यावर हॉस्पिटलने त्यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपये मागितले. अशा या परिस्थितीत काय करणार असा मोठा प्रश्न या दाम्पत्यासमोर पडला. पत्नीला होणारा त्रास पाहून त्यांनी 60 हजार रुपये देण्यास तयारी दाखवली. पण, हॉस्पिटलने हे पैसे लगेच देण्यास सांगितले. हाऊस किपिंगचं काम करणाऱ्या या दाम्पत्याने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून थोडी आणखी मुदत मागितली. पण, त्यांनी यास नकार दिला. त्यामुळे या दाम्पत्याला या हॉस्पिटलमधून बाहेर पडावे लागले. शासकीय रुग्णालयात जागा नाही आणि खासगी हॉस्पिटल जास्त पैसे मागत आहे, अशा परिस्थितीत हे दाम्यत्य अडकले होते. त्यामुळे या दाम्पत्याने  जनरल फिजिशियन डॉक्टर रवींद्र म्हस्के यांना फोन केला. याआधी हे दाम्पत्य या डॉक्टरांना भेटले होते. हेही वाचा- ‘प्लेन लड़का उड़ाए या लड़की, उसे पायलट ही कहते है’ पाहा जान्हवीचा नवा अवतार डॉ. म्हस्के यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने निवारा संस्थेच्या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर सहाय्यक कर्मचाऱ्यांना बोलावून या महिलेची घरीची प्रसूती केली. या महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला.  डॉ. रवींद्र म्हस्के यांनी वेळेवर पोहोचून मदत केल्यामुळे भिसे कुटुंबीयांनी आभार मानले. एवढंच नाहीतर म्हस्के यांनी गरिब कुटुंबाला अन्नधान्याची मदतही केली.  संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या