JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / पोलीस स्टेशनसमोर अग्नितांडव, 32 मोटारसायकल आणि 3 चारचाकी वाहनं जळून खाक

पोलीस स्टेशनसमोर अग्नितांडव, 32 मोटारसायकल आणि 3 चारचाकी वाहनं जळून खाक

वाळीव पोलीस (Waliv Police Station) ठाण्यासमोर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये 3 चारचारी वाहनं आणि 32 मोटारसायकल जळून खाक (Fire at Vasai) झाल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वसई, 14 मार्च: वाळीव पोलीस (Waliv Police Station) ठाण्यासमोर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये 3 चारचारी वाहनं आणि 32 मोटारसायकल जळून खाक (Fire at Vasai) झाल्या आहेत. वाळीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त केलेल्या  वाहनांना अचानक दुपारी 1 च्या सुमारास ही आग लागली. या आगीचे स्वरुप इतके भीषण होते की ही वाहनं जळून खाक (Four Wheeler and Bike set on Fire) झाली आहेत. या आगीचा भीषण व्हिडीओ (Viral Video of Waliv Fire Station) देखील समोर आला आहे.आगीचे लोट यामध्ये वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

संबंधित बातम्या

आग विझवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेतली होती. याठिकाणी काही पोलिसांच्या गाड्या सुद्धा उभ्या होत्या, मात्र प्रसंगावधान राखत या गाड्यांना वाचवण्यात यश आलं आहे. पण आता या पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकताच वसई पोलीस ठाण्यातील जप्त केलेली वाहने पोलिसांनी भंगारात विकल्याची माहिती समोर आली होती, अशावेळी ही आग लागली की लावली याचा पोलीस तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या