मुंबई,23 जून: मुंबई पोलिसांनी दोन बनावट कॉल सेंटरचा **(Fake call centre busted)**पदार्फाश केला आहे. मुंबई क्राईम ब्रांन्चनं मालाड (Malad) येथे छापे टाकून ही कारवाई केली आहे. दोन्ही बनावट कॉल सेंटरमध्ये VOIP कॉलद्वारे परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती. 70trade. com आणि मेक बिझनेस सॉल्यूशन या नावाने हे दोन्ही बनावट कॉल सेंटर चालवले जायचे. दोन्ही कंपन्यांकडून नफा देण्याच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती. हेही वाचा- लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल फसवणूक झाल्याच समजल्यानंतर परदेशी नागरिक कॉल करुन या कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र VOIP कॉल असल्यानं परदेशी नागरिकांचा संपर्क कंपनी सोबत होत नाही. हेही वाचा- माजी महिला पत्रकाराची मुलासह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप दोन्ही बनावट कॉल सेंटरमध्ये एकूण 75 हून अधिक लोकं काम करत होते. माहिती मिळताच, मुंबईच्या क्राईम ब्रांन्चनं दोन्ही कॉल सेंटरवर छापा टाकून आदित्य माहेश्वरी, गिरीराज दमानी या दोघांना अटक केली. अधिका्यांनी घटनास्थळावरून दोन सर्व्हर, हार्ड डिस्क जप्त केलेत. तसंच प्रत्येक कॉम्प्यूटरचे स्क्रीन शॉर्ट्स घेतले आहेत.