JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना तयार! 'स्पेशल 12' वर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना तयार! 'स्पेशल 12' वर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने तयारीला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाने स्थानिक आमदार, खासदार आणि नेत्यांची 12 जणांची टीम तयार केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने तयारीला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाने स्थानिक आमदार, खासदार आणि नेत्यांची 12 जणांची टीम तयार केली आहे. या टीमवर मुंबई महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशी आहे शिंदे गटाची टीम १) शिवेसना खासदार गजानन किर्तीकर, २) मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर, ३) खासदार राहुल शेवाळे ४) आमदार सदा सरवणकर ५) आमदार प्रकाश सुर्वे ६) आमदार यामिनी जाधव ७) आमदार मंगेश कुडाळकर ८) आमदार दिलीप लांडे ९) यशवंत जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष बीएमसी १०) शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे, ११) उपनेत्या आशा मामडी १२) माजी नगरसेविका कामिनी शेवाळे या 12 जणांवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी असेल. शिवसेनेमध्ये झालेल्या भुकंपानंतर मुंबई महापालिकेची पहिलीच निवडणूक असणार आहे. या निवडणुकीची घोषणा अजूनही झालेली नाही. वॉर्ड पुनर्रचना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत, पण नव्या वर्षात या निवडणुका होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या