JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / corona vaccine वरुन केंद्र आणि ठाकरे सरकारमध्ये वाद, राजेश टोपेंनी दिले उत्तर

corona vaccine वरुन केंद्र आणि ठाकरे सरकारमध्ये वाद, राजेश टोपेंनी दिले उत्तर

‘आम्ही राज्यात कोरोना लसीकरणासाठी गती वाढवली आहे. 20 लाख डोस दररोज देण्यावर आमचा भर आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मार्च : राज्यात कोरोना लसीकरण (corona vaccine) मोहीम सुरू असून राज्य सरकारने केंद्राकडे आणखी लशीची मागणी केली आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ‘आधीचा साठा शिल्लक आहे’ अशी टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यात फक्त 10 दिवस पुरेल एवढाच लशीचा साठा असल्याचे सांगितले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्याशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. ‘आम्ही राज्यात कोरोना लसीकरणासाठी गती वाढवली आहे. 20 लाख डोस दररोज देण्यावर आमचा भर आहे.  त्यासाठी मोठाले सेंटर उभारावे लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी परवानगी द्याव्यात, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली. ‘ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे लसीकरण केले जात आहे, पण रुग्णालयांकडून प्रतिसाद दिल जात नाही अशा रुग्णालयांची यादी आम्ही केंद्राकडे देणार आहोत’, असंही टोपे यांनी सांगितले. ‘कोरोनाबाधित रुग्ण ट्रेस करण्यात अडचणी येत आहे. कारण आता सर्वच मोकळे झाले आहे. ज्यांना कोरोनाचा संसर्ग कमी आहे, अशी व्यक्ती जर रेल्वे स्थानकावर गेली तर त्याला ट्रॅक करणे अवघड झाले आहे. आम्ही या सगळ्या अडचणी पंतप्रधान मोदींकडे मांडल्या आहे. कोरोनाची लस देण्यासाठी राज्यात 18080 सेंटर मंजूर करण्यात आले आहे. जवळपास 18 लाख लोकांना लस देण्यात आल्या आहे. यात आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वृद्धांचा समावेश आहे, असंही टोपे यांनी सांगितले. ‘आपण 3 लाख लस देण्याच्या गतीने काम सुरू केले आहे. त्यासाठी लशीचा पुरवठा मिळणे गरजेच आहे. त्यामुळे 20 लाखांची लशी राज्याला मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राजेश भूषण यांना केली आहे.  पण, केंद्रीय मंत्र्यांकडून आपल्यावर टीका करण्यात आली आहे की लशीचा साठा उरलेला आहे. पण जर 3 लाख लशी देण्याचे नियोजन केले आहे तर फक्त 10 दिवसांचा लशीचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. काय म्हणाले जावडेकर? केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारवर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला. ‘आधी महामारीच्या  वेळी सरकारने अयोग्य पद्धतीने हाताळला आणि आता लसीकरणाची मोहिम सुद्धा तशीच हाताळली आहे.  महाराष्ट्र सरकारकडे 54 लाख लसीचे डोस दिले असतानाही अवघ्या 23 लाखाचा वापर केला आहे आणि तरीही सेनेचे खासदार लसीच्या आणखी डोसची मागणी करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीही लसीचे 2 कोटी 20 लाख डोस दिले जावे ही मागणी केली आहे’, असं जावडेकर म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या