मुंबई, 3 मार्च : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले. भाजपने विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. मात्र यावेळीच एका मागे बसलेल्या भाजप आमदाराकडून (BJP MLA) मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख झाला आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. ‘काय तो मुख्यमंत्री’, असं एका आमदाराने म्हटलं आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जबाबदारी स्वीकारत या घटनेबाबत दिलगिरी (Devendra Fadnavis Apologizes) व्यक्त केली. ठाकरे विरुद्ध भाजप नेते भिडले, सभागृहात जोरदार फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचा कालचा दिवस गाजवल्यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज भाजपकडून मैदानात उतरले होते. मुनगंटीवर यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ‘हे सरकार उडाणटप्पू आहे. धानसभा चमकवण्यासाठी 15 कोटी रुपये आहेत पण गोर-गरीबांसाठी पैसे नाही. कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करता आणि त्यांना देण्यासाठी 6-6 महिने पैसे नाही हे करंटं सरकार आहे’, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. हेही वाचा - अजित पवारांचा दणका, फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीची घोषणा सुधीर मुनगंटीवर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: - आमची अजित पवारांशी 72 तासांची मैत्री होती पण तरीही मैत्री कायम आहे - काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येणं हा राजकीय लव्ह जिहाद होता - गुण पत्रिकेत शून्य गुण आणि स्वत:ची पाठ थोपटत आहेत - राज्यात 52 हजार 184 जणांचा कोरोनामुळे मृत्यू - आरोग्य विभागाचा एकही रुपया वाढला नाही - शूर आम्ही सरदार, आम्हाला फक्त कोरोनाची भीती - एका खासगी दवाखान्यात 43 लाख रुपये बिल आले - सरकारच्या उदासिनतेमुळे राज्यात मृत्यू, ही मोठी चूक आहे - निराधारांसाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही सत्तेतून निराधार व्हाल