JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Cyclone Tauktae: भांडूप ते कोथरूड.. पुणे - मुंबईत सुरू झाला वादळाचा इफेक्ट

Cyclone Tauktae: भांडूप ते कोथरूड.. पुणे - मुंबईत सुरू झाला वादळाचा इफेक्ट

Cyclone Tauktae in Mumbai Pune: तौत्के चक्रीवादळ आता हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे.

जाहिरात

Representative Image

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे: अरबी समुद्रात घोंघावणारे तौत्के चक्रीवादळ (Cyclone Tauktae) आता महाराष्ट्र (Maharashtra)-गुजरातच्या (Gujarat) दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तसेच हे वादळ आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचाच परिणाम आता मुंबई (Mumbai)-पुण्यात (Pune) दिसू लागला आहे. कारण मुंबई शहर आणि उपनगरांत तसेच पुणे जिल्ह्यातील विविध भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाल्याचं पहायला मिळत आहे. या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील विविध भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्याच प्रमाणे पुण्यातील विविध भागांत सुद्धा जोरदार वारा वाहत होता आणि त्यासोबतच काही भागांत जोरदार पाऊसही झाला.

मुंबईसह रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वाऱ्यासह पाऊस मुंबईत 16-17 मे रोजी साधारण 50 ते 60 किमी ताशी वेगाने वारे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाऊस सुद्धा राहणार आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या तुलनेन कमी पाऊस-वारा राहील असा अंदाज कुलबा वेधशाळेन वर्तविला आहे. रविवार, दिनांक 16 मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर त्याच दिवशी काही ठिकाणी हा वेग ताशी 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल, अशीही माहिती भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली.

संबंधित बातम्या

Cyclone Tauktae: पुणेकरांनो काळजी घ्या; तौत्के वादळामुळे पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज पुण्यात 11 झाडांची पडझड पुण्यात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रात्री 9 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास 11 झाडांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाहीये. पुण्यातील येरवडा, कोंढवा, कोथरुड, हडपसर, मुकुंदनगर, कल्याणीनगर, धनकवडी, कात्रज, कसबा पेठ याठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून सर्व अधिकारी, जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहिरात

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईतील 850 कोविड रुग्णांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता सदर दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्वाच्या सूचना बेस्ट इलेक्ट्रिक सप्लाय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या विद्युत वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या स्तरावर आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि हं सामग्री सहज सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून कोणत्याही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करता येऊ शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या