JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची महाविकास आघाडीवर टीका, नंतर पोस्ट डिलिट; वाचा काय होती पोस्ट?

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची महाविकास आघाडीवर टीका, नंतर पोस्ट डिलिट; वाचा काय होती पोस्ट?

सोशल मीडियावरुन राजू शेट्टी यांनी आधी टिकेची पोस्ट केली मात्र काही वेळातचं ही पोस्ट डिलिट केली. राजू शेट्टी यांनी पोस्ट डिलिट का केली हे अद्याप कळू शकले नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 30 जून : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर “देवाच्या काठीला आवाज नसतो” असं म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा शाधला आहे. सोशल मीडियावरुन राजू शेट्टी यांनी आधी टिकेची पोस्ट केली मात्र काही वेळातचं ही पोस्ट डिलिट केली. राजू शेट्टी यांनी पोस्ट डिलिट का केली हे अद्याप कळू शकले नाही. काय होती पोस्ट? “महाविकास आघाडीच्या नेत्यांनो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा तुम्ही एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उद्ध्वस्त झाला! देवाच्या काठीला आवाज नसतो!!”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली होती.

फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळात संजय राठोडांना लागणार लॉटरी, थेट…

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे. एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना घेऊन केलं बंड, फडणवीस सरकारमध्ये फक्त 13 जणांना मिळणार संधी? एकनाथ शिंदे यांनी जवळपास 39 आमदारांना घेऊन बंड पुकारले होते पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या गटाला 13 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू आणि तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. तर दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. या यादीबद्दल अद्याप भाजपकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या