मुंबई 22 सप्टेंबर: देशात महाराष्ट्रात आणि राज्यात मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईत तर कोरोनाचा उद्रेक झालाय त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. अशी गंभीर परिस्थिती असतांना मुंबई महापालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशनने या संदर्भात श्वेत पत्रिका प्रसिद्ध केली असून त्यात ही माहिती उघड झाली आहे. 2019 मध्ये महापालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 टक्के पदं तर पॅरा मेडिकलची 43 टक्के पदं रिकामी होती. तर 2018-19मध्ये आरोग्यवरचं 54 टक्के बजेट वापरलच गेलं नाही अशीही माहिती समोर आली आहे. तर 2018 च्या आकडेवारीनुसार रोज 28 लोकांचा कॅन्सरने, 29 लोकांचा मधुमेहाने तर 22 जणांचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू होत असल्याचं आढळून आलं आहे.या आजारांसाठी पालिकेमध्ये ठोस धोरणाचा अभाव असल्याचंही उघड झालं आहे. 2019-20 मध्ये 54टक्के मुलं जन्मतः ऍनेमिक होती असंही आढळून आलं आहे. गेली अनेक वर्ष आरोग्य व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. प्रचंड लोकसंख्या, त्यात गरीबांची मोठी संख्या असं असतानाही आरोग्य व्यवस्थेत पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या नाहीत. आता अचानक कोरोनाचं संकट आल्याने सरकार, महापालिका आणि सगळीच यंत्रणा उघडी पडली आहे असंही त्या अहवालात म्हटलेलं आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ कायम, 20 हजारांपेक्षा जास्त जण डिस्चार्ज दरम्यान श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा जीवघेणा कारभार समोर आला आहे. शहरातल्या हॉस्पिटल्सला गरज असताना आणि रुग्णसंख्या वाढल्यानंतरही महापालिकेने अद्याप व्हेंटिलेटर्सची खरेदी केली नसल्याचं उघड झालं आहे. शहरातला मृत्यूदर वाढत आहे, मात्र खरेदी प्रक्रिया लांबविली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटर्सच्या खरेदीची प्रक्रिया रेंगाळली आहे. मर्जीतला ठेकेदार मिळावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रक्रिया लांबवली असल्याचा आरोप होत आहे. क्रिटिकल कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सची सर्वात जास्त गरज असते. अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जातो. मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने पुरवढा होत नाही त्यामुळे व्हेंटिलेटर्सची नितांत गरज असते. …तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्य सध्या 48 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यातले 20 व्हेंटिलेटर्स हे महापालिकेला सरकारने काही दिवसांपूर्वीच दिले होते. तर सर्व खासगी हॉस्पिटल्सचे मिळून सध्या शहरात एकूण 121 व्हेंटिलेटर्स आहेत. आणखी किमान 50 व्हेंटिलेटर्सची गरज आहे. असं असतानाही खरेदी का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे.