JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाचा सामना कसा करायचा? मुंबईमध्ये मास्कचा मोठा तुटवडा

दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाचा सामना कसा करायचा? मुंबईमध्ये मास्कचा मोठा तुटवडा

देशात Coronavirus ने डोकं वर काढायला सुरूवात झाली आहे, अशावेळी कोरोना मुंबईत दाखल झाला तर त्याचा सामना करणं मुबंईकराना मुश्किल होणार आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मार्च :  देशात Coronavirus ने डोकं वर काढायला सुरूवात झाली आहे, अशावेळी कोरोना मुंबईत दाखल झाला तर त्याचा सामना करणं मुबंईकराना मुश्किल होणार आहे.  मुंबईमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागणारे मास्क आणि नॉन काँटॅक्ट थर्मामीटर्सचा आतापासूनच तुटवडा जाणवू लागला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, Non-Contact thermometers अनेक मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध नाही आहेत. ज्याठिकाणी यांची उपलब्धता आहे, त्याठिकाणी दुकानदारांनी किंमतीमध्ये वाढ केली आहे.  नॉन काँटॅक्ट थर्मामीटर्सची किंमत 500-600 रुपयांवरून वाढवून 2 हजार 500 ते 3 हजारांपर्यंत केली आहे. स्पर्श न करता 15 सेंटीमीटरवरून शारीरिक तापमान मोजण्यासाठी या थर्मामीटर्सचा वापर केला जातो. अत्यंत धोकादायक असणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खाजगी रुग्णालयं किंवा दवाखान्यांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून यांचा वापर करण्यात येतो. ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे (AFDLHF) चे अध्यक्ष अभय पांडे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार या थर्मामीटरची विक्री 3 ते 4 पट अधिक किंमतीने होत आहे. (संबधित- भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर ) त्याचप्रमाणे सर्जिकल आणि एन95 (N95) या मास्कचा देखील तुटवडा आहे. महाराष्ट्रातील मास्कचे उत्पादन करणाऱ्या मॅग्नम मेडिकेअर या कंपनीचे संचालक राकेश भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या मास्कची मागणी 300 टक्क्यांनी वाढली आहे. पण आयातीवर बंदी घातल्यामुळे स्थानिक उत्पादक हे लक्ष्य गाठण्यासाठी धडपडत आहेत.  मुख्य म्हणजे या मास्कसाठी लागणारा कच्चा मालच चीनमधून आयात केला जातो.’ (संबधित- कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वैद्यकीय कर्मचार्‍यांना N95 वापरण्याचे निर्देश दिले आहेत तर इतर माणसं Coronavirus (COVID 19)पासून संरक्षणासाठी सर्जिकल मास्क वापरू शकतात. N95 ची किंमत प्रती मास्क 75 रुपये होती, तर सर्जिकल मास्कची किंमत 8 ते 10 रुपये प्रतिमास्क होती. मात्र आता यामध्ये 35 रुपयांची वाढ झाल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या