JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार; मुंबई हॉटस्पॉट, आज दुपारपर्यंत शहरात 5 मृत्यू; 116 नवे रुग्ण

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार; मुंबई हॉटस्पॉट, आज दुपारपर्यंत शहरात 5 मृत्यू; 116 नवे रुग्ण

कोरोनाच्या साथीने मुंबईत थैमान घातलं आहे. आज दुपारपर्यंतचे आकडेच हादरवणारे आहेत. शहर परिसरात 116 नवे रुग्ण सापडले. त्यातले 55 प्रतिबंधित क्षेत्रातले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 एप्रिल : राज्यात Coronavirus चा फैलाव वाढत आहे. मुंबई देशात सर्वांत मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. आज दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त मुंबई परिसरातच 116 रुग्ण दाखल झाले. ठाण्यात 2 रुग्ण सापडले. याशिवाय 5 रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्याच्या एकूण आकड्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईतच आहेत. मुंबईत आतापर्यंत 590 रुग्ण दाखल झाले आहेत. ही दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या नोंदींची आकडेवारी आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1018 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात 150 रुग्णांची भर पडली. त्यातले 116 जण मुंबईतलेच आहेत. मुंबईतल्या या 116 पैकी 55 रुग्ण आधीच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे मुंबईच्या काही भागात धोका वाढला आहे. आज मुंबईत दाखल असलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला. यातले 4 जण इतरही काही आजारांनी ग्रस्त होते आणि 1 रुग्ण वयोवृद्ध होता, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे.

‘…तोपर्यंत कोरोना व्हायरसला संपवणं अशक्य आहे’

मुंबईच्या या काही ठराविक भागात कोरोनाव्हायरसच्या साथीने तिसरा टप्पा गाठल्याचा संशय आहे. AIIMS च्या संचालकांनी या हॉटस्पॉटमध्ये हा व्हायरस कम्युनिटी स्प्रेडच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं होतं. कोरोनाग्रस्तांची आज नोंदली गेलेली संख्या मुंबई 116 पुणे 18 अहमद नगर 3 बुलढाणा 2 ठाणे 2 नागपूर 3 सातारा 1 औरंगाबाद 3 रत्नागिरी 1 सांगली 1 एकूण -  150 राज्याची आतापर्यंतची संख्या - 1018 पुण्यालाही धोका दुसरीकडे पुण्यातही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. याचं आज भयावह चित्र पुण्यात पाहण्यास मिळाले. अवघ्या 2 तासांत 3 जणांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 12 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आज सकाळी दोन तासातच 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे  शहरात एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही रुग्णांचे वय हे 60 वर्षांपुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. कोरोनामुळे पुण्यात झालेल्या मृतांचा आकडा आता 8 झाला आहे.  तर दिवसभरात 12 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुण्यावरच कोरोनाच संकट गडद होत चाललं आहे. अन्य बातम्या संतापजनक : हा काय माणूस आहे का? मुंबईत बाईकस्वार तरुणीवर थुंकला कोरोनाचे रुग्ण शोधणं झालं सोपं; या टेस्ट किटला भारताने दिली मान्यता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या