JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Ulhasnagar : MNC स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमने सामने, खा. श्रीकांत शिंदेंवर भाजपचा हल्लाबोल

Ulhasnagar : MNC स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमने सामने, खा. श्रीकांत शिंदेंवर भाजपचा हल्लाबोल

Ulhasnagar MNC स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक स्थगित केल्यानं भाजपनं संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं शिवसेनेनं म्हटलं आह.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उल्हासनगर, 9 मे : राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप  (Shivsena vs BJP)असा सत्ता संघर्ष सुरू आहे. त्यात आता उल्हासनगर महापालिकेतदेखील (Ulhasnagar MNC) पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलीय. स्थायी समिती सभापती (Standing committee) पदाच्या निवडणुकीवरीन हा वाद पेटलाय. उल्हासनगर महानगरपालिकेतील स्थायी समितीमध्ये भाजपाकडं पूर्ण बहुमत आहे. तरीही सभापती पदाच्या निवडणुक प्रकियेला सरकारचा स्थागिती आदेश म्हणजेच लोकशाहीची हत्या असल्याचंस भाजपनं म्हटलं आहे. फक्त भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने शिवसेनेने ही खेळी केली असून, नगरविकास विभाग खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या हातचं बाहुलं असल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. भाजपनं पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेनंही भाजपवर पलटवार करत आरोपांचं खंडन केलंय. सत्ता गेल्यानं “भाजप बोखला गया है” असा टोमणा शिवसेनेनं मारला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं निवडणुकीला स्थगिती दिली आहे. भाजप नेत्यांनी खासदारांवर केले आरोप निराधार आहे उलट भाजप सत्तेत असतानाच भ्रष्टाचार झाल्याचा पलटवार शिवसेनेनं केला आहे. (वाचा- Coronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली ) शिवसेना भाजपच्या आरोप प्रत्यारोपांमुळे ऐन कोरोना काळात उल्हासनगर मधील राजकीय वातावरण तापले आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये 22 मार्च रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेमध्ये नवीन आठ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती झाली. 15 एप्रिलला स्थायी समितीच्या सदस्यांपैकी एका व्यक्तीची स्थायी समिती सभापती पदी नियुक्त करण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. पण नंतर 9 एप्रिलला नगरविकास विभागानं निवडणूक प्रक्रियेला एक महिन्याची स्थगिती दिली. तसंच 4 मे रोजी नगरविकास विभागानं पुन्हा एक पत्र काढून निवृत्त झालेल्या सदस्यांना पुन्हा नियुक्त करून जुन्याच सभापतीला काम पाहण्याचे निर्देश दिले. संतापलेल्या भाजपनं हे कशाच्या आधारे केलं असा सवाल केला. महाराष्ट्र सरकारला हाताशी धरून सत्तेचा दुरुपोयोग करत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही केला आहे. (वाचा- कोरोना लशीवरील टॅक्स कपातीच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर अर्थमंत्र्यांचं उत्तर ) उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती मध्ये भाजपाचं बहुमत आहे. तरीही कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या इशाऱ्यावर सरकार चुकीचे काम करत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. भ्रष्टाचाराच्या उद्देशाने त्यांनी हा खटाटोप केल्याचं भाजपनं म्हटलंय. भाजप जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वणी यांनी हे आरोप केले. तर शिवसेना नगरसेवक व शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावले. स्थायी समिती निवडणूक रद्द झाल्यानंतर भाजपने न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, निर्णयाची वाट न पाहता भाजप बिनबुडाचे आरोप करत असून हा न्यायालयाचा अवमान आहे असं शिवसेनेनं म्हटलंय. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर उल्हासनगरमध्ये नेमकं काय होतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या